कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक आणि खलिस्तानी सहानुभूतीदार अमृतपाल सिंग याला शनिवारी पंजाबच्या मोगा जिल्ह्यात केंद्रीय निमलष्करी दलाच्या एका मोठ्या ऑपरेशनमध्ये तासभर चाललेल्या वेगवान पाठलागानंतर अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या दहा बंदूकधाऱ्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. अटकेनंतर पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.